मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे विभागाच्या सेवा, उपक्रम, योजना व उपलब्ध सोयी-सुविधा याबाबत माहिती वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ व सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावी, असे स्पष्ट निर्देश आज जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (DEMO) यांच्यासोबत मुंबईत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिले.
राज्यातील रुग्णालयांमधील सुविधा, राबविण्यात येणाऱ्या योजनांचे यश आणि आरोग्य विभागाच्या कार्याचा पारदर्शक व सकारात्मक प्रतिबिंब माध्यमांतून उमटले पाहिजे. कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रसारित झाल्यास, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांनी तत्काळ वस्तुस्थिती स्पष्ट करावी असेही सांगितले.
ग्रामीण आणि अतिदुर्गम भागांमध्ये जनजागृतीसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असेही मी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीला आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. संजय कुमार जठार तसेच राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.