कोल्हापूर : सद्गुरु संत श्री. बाळूमामा हे सबंध महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. श्री. बाळूमामा यांचे महात्म्य मोठे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दुपारी साडेबाराच्या सुमाराला उपमुख्यमंत्री पवार यांनी आदमापुर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होतो.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या मंदिरात यापूर्वीही मी अनेकदा आलो आहे. परंतु; यावेळी या भेटीत मी सगळं पाहिलं आणि भारावून गेलो. सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचे महात्म्य किती दूरवर पोहोचलेले आहे याचा मला साक्षात्कार झाला, असेही ते म्हणाले. सद्गुरु संत श्री. बाळूमामा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सद्गुरु संत श्री. बाळूमामा मंदिर समितीच्या मवतीने उपमुख्यमंत्री पवार, यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ यांचा धनगरी घोंगडी आणि काठी देऊन सत्कार झाला.