कुंभोज ( विनोद शिंगे)
सन १९८३ ते सन१९९६ अखेर श्री बाहुबली ब्रह्मचार्याश्रम, बाहुबली या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती शरयूताई दप्तरी यांनी अतुलनीय असे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे त्यापूर्वी त्यांचे पिताश्री शेठ लालचंद हिराचंद दोशी हे सन १९६९ ते सन १९८३ अखेर श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम या संस्थेचे अध्यक्ष होते. सध्या बाहुबली ब्रह्मचर्याश्रम या संस्थेच्या विद्यमान ट्रस्टी आहेत. एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली या प्रशालेमध्ये शोकसभा घेण्यात आली.
यावेळी बाहुबली सैस्थेचे अध्यक्ष मा.आ प्रकाश आवाडे, बाबासाहेब पाटील,डी सी पाटील, तात्यासाहेब अथणे, दक्षिण भारत जैन सभेचे माजी अध्यक्ष डी ए पाटील,गोमटेश बेडगे, अनिल हिगलजे,दिपक वाडकर, तसेच सैस्थेचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मा.आ.प्रकाश आवाडे म्हणाले कि अनाकलनीय मानवनिर्मित महान संकट बाहुबली क्षेत्रावर आले असता या साहसी महिलाने जे योगदान दिले आहे आणि एलाचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या सहयोगाने चुटकी सरशी बाहुबली क्षेत्रावरील संकट दूर केले, ते कदापि विसरता येण्यासारखे नाही. म्हणून शरयू ताई यांचे बाहुबली गुरुकुलाच्या इतिहासातील योगदान सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे आहे.
खरंतर ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राशिवाय रामायणाची कथा पूर्ण होत नाही त्याप्रमाणे दोशी घराण्याच्या योगदानाचे उल्लेख आदरपूर्वक केल्याशिवाय बाहुबली गुरुकुलाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
याशिवाय त्यांनी दक्षिण भारत जैन सभा व अन्य संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात व अहिंसा प्रसारक ट्रस्ट या स्वतःच्या ट्रस्टमार्फत जैन धर्माच्या प्रचार प्रसाराचे हिमालयासारखे उत्तुंग कार्य केले आहे. म्हणून भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, जैनरत्न यासारख्या उपाधीने सन्मानित करण्यात आली आहे.
यामध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व बाहुबली विद्यापीठ व संपूर्ण शैक्षणिक संकुल परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.