शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली,तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे.कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो,शिरोळ तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे.

नागरिकांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असणे आवश्यक असून,त्या दृष्टीने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले बांधकाम, उदगाव येथील साकारण्यात येणारे उपजिल्हा रुग्णालय,तसेच मंजूर झालेले मनोरुग्णालय याच्या माध्यमातून आरोग्य विभाग सक्षम केला जात आहे.
शिरोळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जयसिंगपूर येथील स्व.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. या कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर,डॉ. कुमार कदम,डॉ.रश्मी जाधव,डॉ. अनिल कामटे,डॉ.भूषणकुमार यमाटे, डॉ.आशिष कदम,डॉ.नितीन ढोणे यांच्यासह आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545