कोल्हापूर (किशोर जासूद)
विलासराव शिंदे पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने
ई.१०वी व ई.१२वीपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक तथा राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.वैभवदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन सुभाष देसाई, नेताजी कुरणे, दिनकरराव बसुगडे,प्रणव चौगुले, उदय यादव- पाटील, नागनाथ दळवी, श्रीकांत सावंत, शंकर सावंत, माणिक शिंदे, इक्बाल पटेल, राम बसुगडे, सुरेश पाटील प्रकाश बसुगडे, विकास माळी उपस्थित होते.
सर्वांची स्वागत संस्थेचे सचिव प्रकाश बसुगडे यांनी केले प्रस्ताविक प्रणव चौगुले यांनी संस्थेचे कौतुक करुन यामधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असे म्हणाले दत्तात्रय पाटील शेणे व नागेश दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे कु. पूर्वी प्रणव चौगुले,प्रतिकराज किरण जगदाळे आर्यन माणिक शिंदे अर्थव सतिश देसाई विराज सुहास माळी, अश्व प्रताप सिद्ध, नितेश बापट, यश नेताजी शिंदे, सत्यजित रमेश शिंदे, श्रावणी धनाजी देसाई, राजवर्धन सुरेश पाटील, आयान अजिज सन्दे
१२ वी मध्ये अनुष्का कुमार शिंदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कु. पूर्वा प्रणव चौगुले हिने सत्काराबद्दल आभार मानून नक्की भविष्यात नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले.
वैभवदादा शिंदे यांनी हा सत्कार तुमच्या आयुष्यामधला प्रोत्साहन देणारा सत्कार असून भविष्यामध्ये अशीच प्रगती आपण करून आई-वडिलांचे नाव गावाचे नाव उज्वल करावे ही जिद्द मनाशी बाळगा आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाने आपण स्वतःच्या पायावर उभारू शकतो यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनावे असे आव्हान केले.
आभार ईकबाल पटेल यानी मानले.