कुंभोज (विनोद शिंगे)
माजी मंत्री मा आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून शेळके मळा शहापूर येथे योगासन हॉलच्या मागील रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यात आला. या निधीतून रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले असून, या रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
या महत्त्वपूर्ण विकास कामाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला दादासो भाटले, भाउसो आवळे, किसन शिंदे रनजीत अनुसे, राजू कबाडे, निवृत्ती पाटील, अनिल बमनावर, अशोक पुजारी, सुरेश चव्हाण, मुकुंद पालकर, महादेव घाळी, संजय टोणे, अनंत बोरगावे, मोहन बोरगावे, डॉ. आरगे, हेमंत साळुंखे, सचिन भाटले, संदीप बिराजदार, संग्राम दिसिंगे यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.