कोल्हापूर : श्रीराम विविध कार्यकारी सेवा संस्था, डी. वाय. पाटील ग्रुप, तुकाराम महाराज मंडप व ज्ञानेश्वर महाराज मंडप, कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा पॅव्हेलियन ग्राऊंड, कसबा बावडा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून इंदोरीकर महाराजांचे अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख संगम असलेले विचारधन टिपले.
शांतादेवी डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, . पूजा ऋतुराज पाटील, माजी महापौर . वंदना बुचडे, माजी नगरसेविका . माधुरी लाड, माजी जलसंपदा सचिव एकनाथ पाटील यांच्यासह श्रीराम सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील व्हा. चेअरमन अनंत पाटील, संचालिका सविता रणदिवे आणि संचालक मंडळ, तुकाराम महाराज मंडप व ज्ञानेश्वर महाराज मंडपाचे सर्व सदस्य़ आणि हजारो श्रोते उपस्थित होते.
या कलियुगात माणूस संतविचाराशिवाय जगू शकत नाही. यासाठी ज्ञान आणि शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे असा संदेश महाराजांनी दिला. जनसामान्यांच्या आणि गरिबांच्या घरापर्यंत डॉ. डी. वाय. पाटील दादांनी शिक्षणाची गंगा पोहचवली. जे दगड घाव सहन करतात त्यालाच मूर्तीचे रुप येते. मान- अपमान, सुख- दुःख, चांगलं- वाईट या सहा शब्दाला बाजूला ठेऊन समाजाचा सन्मान वाढवण्याचे काम डी. वाय. पाटील कुटुंबियांने केले असे गौरवास्पद भावना इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केल्या.
सध्या डोळ्याने जे बघितले त्यापेक्षाही मोबाईलवर जे आले त्यावर जास्त विश्वास ठेवला जात आहे. त्यामुळे येत्या जूनपासून शाळांमध्ये जाऊन मुलांचं प्रबोधन करणार असल्याचा संकल्प यावेळी केला. आदरणीय इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या माध्यमातून पुढील दहा पिढ्यांसाठी विचारांचा ठेवा मिळाला आहे. विठ्ठलाचा संदेश पोहोचवण्याचं काम महाराज करत असल्याने संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमचा अभिमान असल्याची भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.