कुंभोज : (विनोद शिंगे )
नागपूर विभाग वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने व सहाय्यक आयुक्त गणेश वंडकर यांनी डी.के.टी.ई. (DKTE) टेक्सटाईल अॅण्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान संस्था आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली.
यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, दत्ता टेके, किरण पोवार, राजू गिरी, सुभाष बलवान, चंद्रकांत भोपळे, मुस्ताक मुजावर, सुहास राजमाने, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.