कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज मागणीसाठी बँकेकडे लाडक्या बहिणींचा ओघ वाढला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या माता-भगिनींसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत उद्योग व व्यवसायासाठी महिलांना ३० हजार रुपये अर्थसाह्य मिळणार आहे. मासिक ९६३ रुपयांच्या अत्यल्प हप्त्यावर बँकेने अर्थसहाय्याची ही सुविधा सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत कुरूकली व सुरुपली ता. कागल गावातील बचत खातेदार असलेल्या लाडक्या बहिणींना उद्योग- व्यवसाय उभारणीसाठी अर्थसहाय्य वितरण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र सरकार सर्व माता-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तसेच; केडीसीसी बँकही सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीशी हिमालयासारखी उभी आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार, छोटे-मोठे उद्योगधंदे उभारावेत.अशा भावना यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मा.रंगराव पाटील,मा. विकास पाटील,मा. शशिकांत खोत,मा. राजु पिष्टे, सौ. सुरेखा आरेकर,सौ. राणी पाटील आदी प्रमुखांसह ग्रामस्थ व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.