तमदलगे सूतगिरणी कार्यस्थळास विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांची सदिच्छा भेट

जयसिंगपूरहातकणंगले तालुक्यातील तमदलगे येथील देशभक्त रत्नाप्पांण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुतगिरणी संस्थेस
महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. सूतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार डॉ अशोकराव माने व
माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या हस्ते सभापती शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या स्वागतासाठी सूतगिरणी कार्यस्थळावर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्हयासह महाराष्ट्रात आमदार डॉ अशोकराव माने यांच्या कार्याचा गौरव होत आहे. प्रामाणिक व निष्ठेने लोकसेवा केली तर त्याचे फळ मिळू शकते हे आमदार माने यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी सुरू केलेल्या विविध संस्था सक्षमपणे कार्यरत आहेत. सामाजिक व सहकार क्षेत्रात लोकहिताची दूरदृष्टी ठेवून काम करणाऱ्या या नेतृत्वामुळे
सूतगिरणीच्या माध्यमातून सामान्य लोकांना रोजंदारी मिळाली असून गरजू लोकांच्या हाताला काम देऊन आमदार डॉ माने यांनी सहकारात आदर्श निर्माण केला आहे असे सांगून त्यांनी सूतगिरणीचे कामकाज व वाटचालीबाबत विशेष कौतुक केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी ,माजी जि प सदस्य अरुण इंगवले ,
माजी नगराध्यक्ष डॉ निता माने ,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने ,माजी जि प सदस्य प्रसाद खोबरे , व्हा चेअरमन अनिलराव कांबळे ,माजी सरपंच संदीप कारंडे ,स्वामी समर्थ सूतगिरणी चे कार्यकारी संचालक सुहास राजमाने ,डॉ अभिजित माने , संभाजी बन्ने सर ,संचालक नानासो राजमाने ,वसंत कांबळे, बबन बन्ने
यांच्यासह शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर , गट विकास अधिकारी नारायण घोलप तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706