आ. चंद्रदीप नरकेंची सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्यासोबत बैठक

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्यासोबत आमदार चंद्रदीप नरकेंची बैठक पार पडली. करवीर मतदारसंघातील जितके राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्ग आहेत या सर्व मार्गांवरील खड्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण आणि पॅचवर्क चे काम करावे, यासंबंधी चर्चा झाली.

पावसाळ्यात लोकांना खड्ड्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते, शिवाय अपघातांची संख्यादेखील वाढते त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे मार्गी लावावीत अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना आ. नरके यांनी दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, एस. सी. बुरुड, आयरेकर, उपअभियंता देशपांडे व उपाभियंता कांजर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.