कोल्हापूर : आजरा शहरातील शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचा, समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश देत रयतेचे राज्य उभारले. ते सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचाराने व आदर्शावर जीवनात वाटचाल करूया. हा क्षण आनंदाचा असून त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा आहे.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, माजी आमदार के.पी.पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, आण्णाभाऊ उद्योग समुहाचे प्रमुख अशोकआण्णा चराटी, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजनाताई रेडेकर, महालक्ष्मी बँकेच्या उपाध्यक्षा पद्मजा आपटे, महादेव टोपले, विलास नाईक, ज्योत्स्ना चराटी, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, सुधीर देसाई, सुधीर कुंभार, प्रा.सुनील शिंत्रे, राजेंद्र सावंत, संभाजी इंजल, संजय सावंत, विजय थोरवत, जयवंत सुतार यांच्यासह पुतळा सुशोभीकरण समितीचे पदाधिकारी, विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.