आ. राहुल आवाडेंनी रेंदाळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथून लक्ष्मीवाडी वसाहतपर्यंतच्या रस्त्याच्या विकासासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून रु. 1 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता स्थानिक नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या रस्त्यामुळे वाहतूक सुलभ होणार आहे व दळणवळणाच्या सोयीसुद्धा वाढणार आहेत.

मात्र, काही कारणांमुळे या रस्त्याचे काम अलीकडेच थांबवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर थेट रेंदाळ येथे आ. राहुल आवाडे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान भाजप हुपरी मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर सर, नव महाराष्ट्र सूतगिरणीची संचालक बाळासाहेब माने, बाळासो दानोळे, नितीन पाटील, डॉ. सचिन मेथे, राजू नाईक, महावीर पाटील, भरत पाटील, सर सरताज नायकवडे, अशोक महाजन तसेच तहसीलदार, तलाठी मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, व अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.