वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा इचलकरंजीत सत्कार

कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता. त्यांनी इचलकरंजी येथील डी के टी ई या संस्थेस सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, डी के टी इ चे संचालक रवी आवाडे साहेब व आदित्य आवाडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी संस्थेविषयी माहिती देत इचलकरंजी येथील यंत्रमाग उद्योगा संबंधी अडचणी सांगितल्या.

यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी नगरसेवक सुनील पाटील, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राजू पाटील, सर्जेराव पाटील, रफिक खानापुरे, बाळासो कलागते, अहमद मुजावर, इंदिरा महिला सूत गिरणी च्या व्हा चेअरमन संगीत नरंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज