खा. धैर्यशील मानेंकडून दिव्यांग भावंडांच्या यात्रेसाठी मदत

कोल्हापूर : विकलांग सेवाभावी संस्था, नांदणी यांच्या माध्यमातून १६० अंध, मतिमंद, मुखबधिर व पॉलिओग्रस्त अशा दिव्यांग बांधवांची अयोध्या व शिखरजी तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती. ही यात्रा २४ एप्रिल ते ६ मे २०२५ या कालावधीत नियोजित होती.
मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे अनेक दिव्यांग प्रवाशांची तिकीट कन्फर्म होण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

 

याची माहिती विकलांग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षांनी खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून दिली. लगेचच रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार, सातत्याने संवाद साधत प्रत्येक प्रवाश्याला तिकीट मिळेल याची खात्री केली. आणि एक स्वतंत्र बोगी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करून उर्वरित प्रवाश्यांना अन्य उपलब्ध बोग्यांमध्ये कन्फर्म सीट्स देण्यात आल्या.
आज कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन या सर्व दिव्यांग भावंडांना शुभेच्छा देताना मन हेलावून गेलं. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि विश्वास आगामी कामास एक नवीन ऊर्जा देणारा होता.असे मत खा. धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.