भागीरथी महिला संस्थेमार्फत आयोजित मोफत क्लॉथ पेंटिंग तीन दिवसीय कार्यशाळेची सांगता

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मोफत क्लॉथ पेंटिंग तीन दिवसीय कार्यशाळेची सांगता भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

महिलांना रोजगार मिळवून देणे ही संस्थेची जबाबदारी आहे परंतु त्याचबरोबर महिलांच्या कलात्मतेला वाव मिळावा आणि त्यातूनच आर्थिक उत्पन्नाची बाजू सक्षम व्हावी. या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सौ. महाडिक यांनी सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आभार व्यक्त केले आणि या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट वाटप केले. या कार्यशाळेला सुचिता बेंडके यांनी प्रशिक्षण दिले

🤙 9921334545