सराईत चोरट्याकडून तीन मोटारसायकली जप्त कळे पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : पुनाळ (ता. पन्हाळा) येथील सराईत मोटारसायकल चोरट्यास कळे पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या. ओंकार निवास पाटील (वय २५, रा. पुनाळ) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सूरज राजाराम पाटील (वय २६ रा. निवडे, ता. पन्हाळा) यांची दुचाकी (एमएच ०९ डीव्ही ६३४४) ही रविवारी रात्री १०.०० च्या सुमारास पोहाळे ता. पन्हाळा येथून अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद सोमवारी रात्री कळे पोलिसांत दिली होती. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहा. फौजदार राजेश होळी व पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम शिंदे हे रात्री गस्त करीत असताना कळे-काटेभोगाव पुनाळ या रस्त्यावर चोरीच्या दुचाकीसह ओंकार पाटील संशयितरीत्या मिळून
आला. त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याच्याकडून १ लाख १० हजारांच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या. कळे येथील न्यायालयात संशयित ओंकार पाटील याला उभे केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी दिली.
या चोरीचा तपास कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शाहूवाडी विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक रणजित पाटील, सहायक फौजदार राजेश होळी, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय कुंभार, पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम शिंदे, पोलिस हवालदार शंकर पाटील व पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम शिंदे यांनी केला.

🤙 9921334545