कुंभोज (विनोद शिंगे)
वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. गुणात्मक व दर्जेदार शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी इन्स्टिट्यूशन्सने सातत्याने राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन पद्धतीतील आघाडी यामुळे इन्स्टिट्यूशन्सला हा सन्मान मिळाला आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि संशोधन क्षेत्रात अधिक प्रभावी व स्वतंत्रपूर्ण काम करण्याची संधी मिळणार आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविण्याची परंपरा इन्स्टिट्यूशनने आघाडीवर राहत जोपासली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.
स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्याचा कार्यक्रम इन्स्टिट्यूशन्समध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने, उपप्राचार्य प्रा. प्रवीण घेवारी उपस्थित होते.