कोल्हापूर : रत्नागिरी – नागपूर हा सध्या चौपदरी रस्ता अस्तित्वात असताना राज्य सरकारने या रस्त्याला समांतर प्रति किलोमीटर १०७ कोटी रूपये याप्रमाणे ८६ हजार कोटी खर्च करून शक्तिपीठ महामार्ग करत आहे.या महामार्गाला शेतक-यांचा विरोध असून बाधित महागाव तालुक्यातील मलकापूर येथे आज संयुक्त मोजणी ला विरोध करत ग्रामस्थांनी अधिका-यांना मोजणी थांबवून जाण्यास सांगितले.
विकासाला शेतक-यांचा विरोध नाही मात्र सध्या रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी. यामुळे राज्यातील नागरीकांना पुढील किमान ९० वर्षे टोल भरावा लागणार असून भविष्यात गरज भासल्यास सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी -नागपूर हा रस्ता रूंदीकरण करणे सहज शक्य आहे.
५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री व अधिका-यांनी संगनमताने हा प्रकल्प राज्यातील नागरिकांच्या माथा मारला जात आहे.असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले .