स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने टाकळीमिया येथे कर्जमुक्ती शेतकरी मेळावा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने टाकळीमिया ता. राहूरी जि. अहिल्यानगर येथे कर्जमुक्ती शेतकरी मेळावा घेण्यात आला.
यावेळी राहूरी तालुक्यातील शेतक-यांच्यावतीने उच्च न्यायालयात एक रक्कमी एफ. आर. पी चा न्यायालयीन लढा जिंकल्याबद्दल राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्हयात उसाबरोबर कांदा व मक्का उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल १५०० रूपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. अमेरीकेच्या आयात शुल्काच्या टॅरीप युध्दामुळे अमेरीकेच्या दबावास बळी पडून सोयाबीन , मका आयात होण्याची शक्यता असून यामुळे मक्का व सोयाबीन शेतक-यांची माती होण्याची शक्यता आहे.असे राजू शेट्टी म्हणाले.