कोल्हापूर : रामतिर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, आजरा, ता.आजरा या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
गेल्या 25 वर्षांमध्ये पतसंस्थेचे काम उल्लेखनीय असून सभासदांच्या हिताचे आहे. अशाच पद्धतीने व संस्थेचे काम अविरत चालू ठेवण्याच्या शुभेच्छा मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, अशोकअण्णा चराटी, उमेश आपटे, अंजनाताई रेडेकर, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी ढमाले साहेब, राजेंद्र सावंत, मायकल फर्नांडिस सर, राजाराम वरुटे सर, जनार्दन निऊंगरे, विजया निऊंगरे, संभाजी बापट, चेअरमन मारुती देसाई, माधुरी मोरे यांच्यासह प्रमुख मान्यवर, संचालक व सभासद उपस्थित होते.
