भागीरथी महिला संस्थेमार्फत तीन दिवसीय ‘मोफत क्लॉथ पेंटिंग क्लासेस’ कार्यशाळा

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत तीन दिवसीय ‘मोफत क्लॉथ पेंटिंग क्लासेस’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा  अरुंधती महाडिक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी महिलांच्या कलात्मक क्षमतेला वाव मिळावा, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि उद्योजकीय वाटचालीस चालना मिळावी, यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी आपले छंद व्यवसायात रूपांतर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेत मा. सुचित्रा बेंडके यांनी प्रशिक्षण देत महिलांना कपड्यांवर चित्र रंगवण्याच्या विविध तंत्रांची माहिती दिली.
महिलांना कलात्मकता आणि आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ही कार्यशाळा तीन दिवस चालणार असून, दररोज विविध डिझाइन्स, रंगसंगती व चित्रकलेतील बारकावे शिकवले जाणार आहेत.