ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धामणी येथे गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण

कोल्हापूर : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र शासनाकडून धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियोजित वेळेत होत आहे. येथील पंचक्रोशीतील पाण्याची कमतरता यापुढे राहणार नसून या गावातील शेतकरी व ग्रामस्थ आनंदाने नागरी सुविधांचा लाभ घेतील. धामणी प्रकल्पग्रस्तांचे पहिले पुनर्वसन नंतर धरणाचे काम होत असल्याने नागरिकांची कोणतीही तक्रार होणार नाही. या प्रकल्पाच्या पूर्णत्वास नागरिकांचे, जलसंपदा व विविध विभागाकडून मुदतीत काम पूर्ण चांगले सहकार्य मिळाले आहे.
नव्याने बस थांबा, प्राथमिक शाळा इमारत, स्मशान शेड, ग्रामपंचायत इमारत, समाज मंदिर, पाणीपुरवठा आदी पुनर्वसित नागरी सुविधांचा लोकार्पण कार्यक्रम यावेळी करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अरुणराव जाधव, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, अधिक्षक अभियंता (यांत्रिकी) खाडे, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता एस.एन.पाटील, दूधगंगा प्रकल्प उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड, यांत्रिकी विभागाचे संग्राम पाटील, दूधगंगा प्रकल्पचे सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे, पडसाळी सरपंच कविता शेळके, उपसरपंच अंकुश जिनगरे, माजी सरपंच तानाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी चौगुले, दीपक शेट्टी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706