कोल्हापूर:
गांधीनगर मधील रस्त्याकडेला बबन उदासी हा फेरीवाला कापड विक्री करतो पूर्वी हा विक्रेता पद्मा चौक,कोल्हापूर येथे खोक्या मध्ये लहान मुलांचे रेडीमेड कपडे विकत होता सदर दुकानाचे खोके अतिक्रमण मध्ये गेल्याने खचून न जाता नंतर लक्ष्मीपुरी रस्त्याकडेला काही दिवस कपड्यांची विक्री केली त्यानंतर गांधीनगर रस्त्याकडेला लहान मुलांचे चड्डी बनियन विकून आपला उदरनिर्वाह चालू ठेवला काल दिनांक:१८/०४/२०२५ रोजी ग्रामीण भागातील काही पुरुष व महिला लग्नाचा जत्था काढण्यासाठी आलेल्या लोकांची एक लाख रुपये असलेली बॅग फेरीवाल्याच्या दुकानासमोर गाडीवरती रस्त्याकडेला ठेवलेल्या ठिकाणी विसरले होते तेथून ती लोक निघून गेली होती

त्यानंतर बबन उदासी यांनी ती बॅग तेथून उचलून आपल्या दुकानाजवळ ठेवली त्यानंतर सदर मंडळी विसरलेली बॅग शोधत शोधत त्याच्या दुकानाजवळ आली व त्याला विचारले असता त्यांने आपल्या जवळील ती बॅग त्यांना दाखवली असता सदर बॅग ही आमची आहे हे त्यांनी सांगितले त्यानंतर बबनने ती बॅग संबंधितांना परत दिली व बॅग उघडली असता त्यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम बरोबर असल्याचे सदर लोकांनी बघितले व समाधान व्यक्त करत संबंधित बबन उदासीचे आभार मानले व यामधील तुम्हाला बक्षीस म्हणून चार-पाच हजार रुपये घ्या असे त्या मंडळींनी फेरीवाल्याला बोलल्यानंतर त्याने मला एकही रुपया नको पण तुमचा आशीर्वाद द्या असे बोलल्यानंतर संबंधित लोकांनी खरंच या दुनियेत चांगली माणसं आहेत असे उद्गार काढत संबंधित बबन उदासी याला नमस्कार केला व त्यांच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचे आनंद अश्रू आले होते एवढी मोठी रक्कम परत मिळाली नसती तर आम्ही लग्नाचा जत्था काढू शकलो नसतो असे म्हणत ती मंडळी तिथून निघून गेली ही गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित बबन उदासी ह्या फेरीवाला कापड विक्रेत्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्याने केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल त्याचे अभिनंदन केले..*
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, दीपक पोपटाणी फ्रेम वाला, किशोर कामरा, दीपक धिंग , दीपक पोपटानी अंकल, वीरेंद्र भोपळे, जितू चावला, अजित चव्हाण, प्रफुल्ल घोरपडे, आदि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते
