उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

मुंबई  : भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी फडणवीसांना सांगतो, आधी घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे, असे करून दाखवा. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आम्ही प्रेमाने सगळे ऐकू. पण सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून टाकू, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सरकारला दिला. तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी अचानक दोन वेळेस राष्ट्रवादी वाजले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे. खूप जणांना काही देता आलं नाही तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले. आज सुद्धा कायदे आणलेत, कामगारांनी त्याला विरोध केलाच पाहिजे. पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो.  आता वक्फ बोर्ड आणला गेला, त्यामध्ये सुद्धा आपण जो प्रश्न विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला. वक्फ बोर्डावर जर तुम्ही कायद्यानं गैर मुस्लिम माणूस ठेवताय तर आमच्या हिंदूंमध्ये सुद्धा तुम्ही उद्या काहीही करू शकता? आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत, असे त्यांनी म्हटले.