कोल्हापूर : मौजे तासगांव (ता.हातकणंगले) येथील आमदार विनयरावजी कोरे (सावकर) पाणीपुरवठा संस्थेला उपसा जलसिंचन योजनेतर्गंत २५ % अनुदानावर ५४ लाख ८१ हजार २५० रुपये व शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे पाणीपुरवठा संस्थेला उपसा जलसिंचन योजनेतर्गंत २५ % अनुदानावर ५१ लाख ८६ हजार २५० रुपये अशा दोन्ही संस्थांना एकूण १ कोटी ६ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे अनुदान मिळाल्याबद्दल आमदार विनय कोरे यांचे संस्थेच्यावतीने आभार मानले.

यावेळी तासगांवचे माजी सरपंच शिवाजी आकाराम पाटील, संस्थेचे चेअरमन संपतराव यशवंत पाटील,व्हा.चेअरमन शामराव हंबीर पाटील,संस्थेचे चेअरमन उत्तमराव शंकर पाटील,व्हा.चेअरमन संतोष उत्तमराव पाटील,नामदेव दत्तू पाटील,तानाजी बाळासो पाटील,सुनिल पोवार,कृष्णात बाबासो पाटील,जयसिंग पंडित पाटील,माणिक बाळासो पाटील,भानुदास बाबासो पाटील,भिमराव खाशाबा पाटोळे,आनंदराव आकाराम पाटील,विजय गणपतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
