कुंभोज ( विनोद शिंगे)
हलकर्णी चंदणकुडी ता.गडहिगलज परिसरात कायदेशीर रित्या सर्व शासकीय परवानगी घेऊन सुरू असलेले क्रशर अचानक अधिकार नसताना बंद केले बाबत.काही अल्पसंतुष्ट लोकांनी तहसीलदार गडहिंग्लज यांच्याकडे खोटी तक्रार अर्ज दाखल केली. त्या अगोदर ७/३/२०२५ रोजी तहसीलदार यांनी कोणतीही चौकशी न करता, संबंधित कार्यालयाचा अहवाल न घेता, संबंधित क्रशर मालकांची बैठक व त्यांची बाजू न ऐकता तातडीने हेतू पुरस्कर क्रशर बंद करण्याचे आदेश अधिकार नसताना दिले. बंद आदेश मध्ये कायदा व सुव्यस्थेचे कारण देऊन सर्व क्रशर बंद पाडले.

दिनांक १८/३/२०२५ रोजी सर्व क्रशर धारकांनी मिळून एक निवेदन क्रशर पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा अधिकारी कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज, तहसीलदार गडहिंग्लज यांना देऊन सुद्धा त्यावर कोणतीही चौकशी किंवा कोणतीही माहिती दिलेली नाही
त्यानंतर २५/३/२०२५ ला दुसरे पत्र परत कोणतीही चौकशी न करता दिले त्यामध्ये क्रशर धारकांनी प्रदूषण महामंडळाच्या अटी शर्तीचा भंग केला असा उल्लेख करून बोरचे पाणी गेले, गोठ्यामधील जनावरे आजारी पडली व क्रशरमुळे काही लोकांना श्वसनाचे आजार झाले असे काही लोकांच्या सांगण्यावरून नमूद केले.
तरी सर्व क्रशरधारकांनी मिळून यासंदर्भात पशुवैद्यकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व आजूबाजूच्या ग्रामपंचायती यांच्याकडून माहिती घेतली असता हे सगळे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाले. याची अधिक माहिती घेतली असता काही लोकांनी पैशाचा हव्यासापोटी अवाजवी पैशाची मागणी केली त्याची पूर्तता क्रशरमालक न करू शकल्यामुळे काही लोकांना हाताशी धरून तहसीलदार गडहिंग्लज यांचे कडे क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची खोटी तक्रार अर्ज दाखल केला.
तरी जवळजवळ महिना क्रशर व्यवसाय बंद असल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसान व क्रशर व्यवसायावरती अवलंबून असलेली 400 ते 500 कुटुंबांच्या वरती आलेली उपासमारीची वेळ. यामुळे सर्व क्रशर धारकांनी कायदेशीर मार्ग स्वीकारून दिनांक ३/४/२०२५ रोजी उच्च न्यायालय मुंबई येथे दाद मागितली आहे.हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये जाताच दिनांक ३/४/२०२५ रोजी माननीय तहसीलदार यांनी आपण दिलेला बंदी आदेश माघारी घेतला. दिनांक ७/४/२०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व क्रशर धारकांनी आपले क्रशर पूर्ववत सुरू सुरू केले.
हलकर्णी परिसरातील क्रशर हे गेली १२ वर्षे सुरू असून क्रशर साठी हा परिसर निवडला असताना कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने सर्वे करून क्रशर क्लस्टर म्हणून जाहीर केलेला आहे सध्या ह्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती दहा क्रशर कार्यरत आहेत त्यापैकी महाराष्ट्र हलकर्णी मधील सात क्रशर व कर्नाटक खानापूर परिसरांमधून तीन क्रशर हे शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्व परवानगी घेऊन सुरू आहेत. सदरच्या क्रशरमधून निघणारी कृत्रिम वाळू व खडी हे नॅशनल हायवे, स्टेट हायवे, जिल्हा रोड व खाजगी बांधकाम यासाठी पुरवठा होते.
सदर क्रशर धारकांकडून राजू पाटील व इतर तक्रारदार हे धमकावून वर्षाला पैशाची मागणी करतात त्याचे पुरावे क्रशर मालकांकडे आहेत. तक्रारदार हा विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करतो जनतेची दिशाभूल करून क्रशर धारकांकडून पैसे उकळणे हा त्याचा व्यवसाय बनलेला आहे. तसेच राजू पाटील याने जे तक्रारीचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याची शहानिशा केली असता आरोग्य केंद्राकडून, पशुवैद्यकीय केंद्राकडून, ग्रामपंचायती कडून ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. दिनांक १७/४/२०२५ पासून सुरू झालेले हे आंदोलन मुक्या प्राण्यांवर अन्याय करून वाढीव पैशाची मागणीसाठी होत आहे.असे मत पत्रकार बैठकीत
आय. एस. पाटील, सुनिल कदम,अशोक नामदेव पोवार यांनी प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.उद्योगधंद्यांना पूरक वातावरण महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले असताना स्थानिक गाव गुंडांनी हेतू पुरस्कार त्रास देऊन पैसे काढण्यासाठी उद्योगधंदे बंद करू पाहत आहेत.असे डी सी पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
