कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सी वॉर्ड, बिंदू चौक येथील जनरल मटण मार्केट रोड ते बडी मस्जिद, गंजी गल्ली या परीसरातील दुकानगाळया समोरील अनाधिकृत छपऱ्या, चिकन गाडया व शेड काढण्यात आज काढण्यात आले. हि कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्र 2 यांच्या मार्फतजनरल मटण मार्केट रोड परीसरातील दुकानगाळेसमोरील अनाधिकृत छपऱ्या, चिकन गाडया व शेड हटविले 10 ते 5.00 च्या सुमारास करण्यात आली.
यामध्ये अनाधिकृतपणे मारण्यात आलेले 10 X 10 चे 1 शेड काढले, 23 छपऱ्या व 14 चिकन गाड्या व 6 लोखंडी कोंबडयांच्या जाळया जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, मुकादम रवी कांबळे, अतिक्रमण कर्मचारी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेचे 8 कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.
तरी शहरातील मेनरोडवरील नविन विद्युत हेरिटेज खांबावर अथवा महापालिकेच्या कोणत्याही मालमत्तेवर कोठेही विनापरवाना डिजीटल फलक, बॅनर लाऊ नये असे आढळलेस संबधिंतावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आले आहे.