कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोडिंग, इचलकरंजी येथे आयोजित श्रीमद्देवाधिदेव भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ सध्या अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. या महोत्सवात पंचकल्याणक म्हणजेच गर्भ, जन्म, तप, ज्ञान व मोक्ष या पाच अत्यंत पवित्र अवस्थांचा भव्य धार्मिक कार्यक्रम साजरा होत आहे.
या पावन अवसरावर राज्याचे माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व राहुल आवाडे यांनी विशेष उपस्थिती लावून आपला सदिच्छा सहभाग नोंदवला. त्यांनी अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकरांच्या नूतन मूर्तीचे दर्शन घेतले व या धार्मिक आयोजनाचे महत्व जाणून घेतले.
या महायज्ञामध्ये माजी नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे आई, सौ वैशाली आवाडे वहिनी, पंचकल्याण कमिटीचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपाध्यक्ष सुभाष बलवान, जैन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, बाबासाहेब हुपरे, सुरेश मगदूम, अशोक मगदूम, बापूसो संक्कान्ना, पार्श्वनाथ पाटील, शुभम कोथळे, राजू बोंद्रे, नितेश पोवार यांच्यासह देशभरातील जैन समाज बांधव, आचार्य, मुनिराज आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मभावना वृद्धिंगत करत आहेत. विश्वशांतीचा संदेश देणारा हा महोत्सव धर्म, संस्कृती आणि मानवतेच्या एकत्रित भावनेचा आदर्श उदाहरण ठरत आहे.
माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या समवेत आयोजकांच्या कार्याचे कौतुक करत, अशा धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन व आध्यात्मिक जागृती घडून येते, असे मनोगत राहुल आवाडे यांनी व्यक्त केले.
हे पावन पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरत असून, भाविकांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा ठरतो आहे.