कोल्हापूर : आळवे (ता.पन्हाळा) येथे एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून व ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने साकारलेल्या विद्या मंदिर आळवे या नुतन शाळेच्या इमारतीचे लोकार्पण खासदार धैर्यशिल माने व आमदार विनय कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच एम्पथी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.सुंदेशश्वरण,सुदर्शन सुराणा,विनोदकुमार जैन,विनिता सुराणा,देवांश सुराणा,पलक जैन,कलावती जैन यांच्यासह एम्पथी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील,सरपंच डॉ.वसंत भिमराव पाटील,उपसरपंच विलास गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य युवराज गायकवाड,योगेश पाटील,मृणाल खामकर,सुवर्णा कुंभार,भाग्यश्री वांद्रे,शिवाजी गायकवाड,बळवंत गायकवाड,संजय बंगे,शिवाजी बंगे,संजय गावडे,संग्राम बंगे,मारुती गायकवाड,राजू चौगुले,सरदार कुंभार,कृष्णात पाटील,संदिप कुंभार,विलास कुंभार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सरिता बंगे,उपाध्यक्ष,समितीचे सर्व सदस्य,विद्या मंदिर आळवेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग,श्री भैरव विकास सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी,गावातील तरुण मंडळ,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…