भुदरगड भूषण व आदर्श माता पुरस्कार सोहळा संपन्न

कोल्हापूर :भुदरगड तालुका जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्था, गारगोटी, ता.भुदरगड यांचे विद्यमाने दरवर्षी भुदरगड भूषण व आदर्श माता पुरस्कार दिले जातात. सन 2024-25 सालातील भुदरगड भूषण पुरस्कार मंत्री प्रकाश आबिटकर यांचे वडील गारगोटीचे माजी सरपंच भाई आनंदरावजी आबिटकर यांना व आदर्शमाता पुरस्कार श्रीमती किर्तीताई देसाई यांना राष्ट्रसंत प.पू.अदृश्य काडसिध्देशर स्वामीजी यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

यावेळी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, जेष्ठनेते बी.एस.देसाई (आण्णाजी), कोकण केसरी के.जी.नांदेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, बाळकाका देसाई, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, शामराव भावके, गारगोटी सरपंच प्रकाश वास्कर, उपसरपंच प्रशांत भोई, जेष्ठ नागरीक संस्थेचे अध्यक्ष एम.आर.टिपुगडे, उपाध्यक्ष ए.के.देसाई, सचिव बी.एस.माने, बी.ए.सदलगे यांच्यासह प्रमुख मान्यवर, जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706