कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी गेल्या दोन वर्षात तब्बल रू. १,०३३ कोटी एवढा प्रचंड निधी आला आणला, येत्या काळात विधानसभा मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार.असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

हायब्रीड ॲन्युटी मॉडेल (H.A.M.) योजनेअंतर्गत यळगुड- कागल- केनवडे व गोरंबे फाटा- मुरगुड- सेनापती कापशी- गडहिंग्लज या ७१ किलोमीटर रस्त्यासाठी रू. ४४५ कोटी निधी मंजूर झाला आहे. पंजाब नॅशनल बँक, युको बँक, कॅनरा बँक, आय. एफ. सी. बँक यांच्या अर्थसाहाय्यातून हा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी मुरगुड- दौलतवाडी- सेनापती कापशी- बेरडवाडी- हडलगे तिट्टा या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते अलाबाद (ता. कागल) येथे झाला.
मंत्री मुश्रीफ यांनी कंत्राटदारांना दर्जेदार रस्ते कामाविषयी सूचना दिल्या. काँक्रिटीकरणाची सर्व कामे दर्जेदार करा. २५ ते ३० वर्षे या रस्त्यांबद्दल तक्रारी येणार नाहीत, प्रसाद दर्जा व गुणवत्ता ठेवा. या रस्त्यांच्या अनुषंगाने गावागावांतील ज्या अडचणी असतील त्या कंत्राटदारांनी सोडवाव्यात.
मुख्य रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी केंद्रीय रस्ते निधीमधून संकेश्वर- गडहिंग्लज- आजरा- आंबोली मार्गासाठी रू. ३०० कोटी निधी आणला. हॅम योजनेअंतर्गत बेलेवाडी हुबळगीपासून- उत्तुर- मुमेवाडी व पुढे गडहिंग्लज रस्त्यासाठी रू. १२५ कोटी निधी आणला आहे . हॅममधूनच लिंगनूरपासून- मुरगुड व मुदाळ तिट्टापर्यंत रू. १२५ कोटी निधी आणला. यळगूड- कागल- मुरगुड- कापशी-गडहिंग्लज रस्त्यासाठी रू. ४४५ कोटी निधी आणला. मुख्यमंत्री सडक योजना टप्पा दोन अंतर्गत रू. ५० कोटी निधी आणला.
गेला विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तनाच्या बतावण्या करणाऱ्यांनी माझा पराभव करण्यासाठी अनेक कुटील हातखंडे वापरले. माझ्यामागे ई. डी. सह अनेक कारवायांचा ससेमिरा लावला. माझ्या कुटुंबीयांनाही छळले. परंतु; बहाद्दर कार्यकर्ते आणि गोरगरीब जनतेने हा ऐतिहासिक विजय खेचून आणला. खऱ्या अर्थाने तो त्यांचाच विजय आहे.असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले
पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत म्हणाले विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नामदार हसन साहेब मुस्लिम म्हणत होते दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल आणि कार्यकर्ते त्यानंतर साहेब त्यानंतर मंत्री मुश्रीफ सल्ला सहा वेळा विजयी झाले आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्ते आणि गोरगरीब जनतेच्या जीवनात सुख आल.
हा रस्ता ज्या गावांमधून जातो त्या, मुरगुड, दौलतवाडी, हळदवडे, करंजीवने, बेलेवाडी मासा, अलाबाद, सेनापती कापशी, बाळेघोल, बेरडवाडी, हणबरवाडी या गावांमधील लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ सत्कार केला.
यावेळी शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, दिग्विजयसिंह पाटील- मुरगुडकर आदी प्रमुखांची भाषणे झाली.
व्यासपीठावर तालुका संघाचे संचालक अंकुश पाटील, जोती मुसळे, शामराव पाटील, धनाजी तोरसकर, सरपंच लता कांबळे, उपसरपंच दिनेश मुसळे, कापशी सरपंच उज्वला कांबळे, बाळेघोल सरपंच सिरसाप्पा खतकल्ले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत तानाजी कामते यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच सौ. वंदना मुसळे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल कुंभार यांनी केले. आभार संजय भराडे रा. हळदवडे यांनी मानले.

 

🤙 9921334545