कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्ह्याची औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद-2025, कोल्हापूर येथे उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ज्या दिवशी जागा निश्चिती होईल, त्याच दिवशी आयटी पार्कचा शासन निर्णय काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच युवकांना रोजगार निर्मिती करुन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांबरोबरच यापुढे सहकारी बँकांमधूनही कर्जपुरवठा ग्राह्य धरण्यात येण्याबाबतचा शासन निर्णय येत्या पंधरा दिवसात काढण्यात येईल. त्याचबरोबर भविष्यात अधिकाधिक दर्जेदार उद्योग प्रकल्प कोल्हापुरात उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची अशी ग्वाही उद्योगमंत्री नाम.उदयजी सामंत यांनी दिली.
यावेळी सामंजस्य कराराचे आदान प्रदान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उद्दिष्ट पूर्ती व उल्लेखनीय काम केलेल्या विविध बँकर्सना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आजच्या गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मा. आमदार सुजित मिणचेकर, पुणे विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज