गोकुळ दूध संघ देशात एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही : ना.हसन मुश्रीफ

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विश्वासराव नारायण पाटील (आबाजी) यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्यास हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे माजी गृह व ऊर्जामंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेउपस्थित होते.
स्वर्गीय एस आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आबाजींची सहकार संस्थेतील जडणघडण झाली. कुणाच्याही घरी सुखाची अथवा दुःखाची घटना घडली आबाजी तिथे पोहोचलेच असे माणुसकी जपण्याचे काम केले आहे. आबाजींना दीर्घायुष्य लाभो व आबाजींच्या व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ देशात एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही, अशा शुभेच्छा मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
या कार्यक्रमास पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर , सांगलीचे खासदार विशाल पाटील , काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील , आमदार जयंत आसगांवकर, आमदार चंद्रदीप नरके , माजी आमदार राजेश पाटील, के पी पाटील, संपतराव पवार – पाटील, सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे, ए वाय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी, गोकुळ दूध संघाचे सर्व संचालक, केडीसीसी बँकेचे सर्व संचालक व बंधु, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 9921334545