हातकलंगले तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्य उल्लेखनीय- नितीन बानगुडे पाटील

कुंभोज (विनोद शिंगे)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी आज इचलकरंजी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक गणेश भांबे, उमेश पाटील नाना, तिळवणी ग्रामपंचायत सदस्य निवास कोळी, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम, युवासेना जिल्हा समन्वयक अविनाश वासुदेव, युवासेना तालुकाप्रमुख अभिजीत लोले, शहरप्रमुख सागर जाधव, शहरसमन्वयक रतन वाझे, शहरसमन्वयक संतोष लवटे, समर्थ परीट, उमेश शिंदे, गणेश नाईक व इतर शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.