दुर्गेवाडी येथे बौद्ध विहाराला भैय्यासाहेब आंबेडकर यांची भेट

कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गेवाडी येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या बौद्ध विहाराला भैय्यासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली.या ठिकाणी 1970च्या दशकात अत्यंत दुर्गम अशा शाहूवाडी, चांदोली धरण परिसरात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामूहिक धम्म दीक्षेने परिवर्तन घडवले.

 

 

या धम्मवीरांचा जनसमुदाय विस्थापित होऊन दुर्गेवाडी येथे पुनर्वसन झाला आणि आजही येथे त्या काळात स्थापन केलेली एक अप्रतिम बुद्धमूर्ती पाहायला मिळाली.
मन भारावून गेले असल्याचे आंबेडकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी बौद्ध समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.