आ. विनय कोरेंच्या हस्ते कोडोली येथे ३ घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : कोडोली (ता.पन्हाळा) येथे कोडोली ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून नव्याने घेण्यात आलेल्या ३ घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला.

 

 

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील (भाऊ) यांच्यासह कोडोली गावच्या सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य व कोडोली गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते…