कोल्हापूर :सुरज सोडाजवळ, चंदूर रोड, इचलकरंजी येथे उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने नवीन आणि अत्याधुनिक फन पार्क रेस्टॉरंटचा शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन समारंभात प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे तसेच आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते रेस्टॉरंटचे उद्घाटन केले.

उद्घाटन समारंभाच्या वेळी मान्यवरांनी या रेस्टॉरंटच्या स्थापनेसाठी केलेल्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना चालना मिळण्यासह नागरिकांना उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली. रेस्टॉरंटमध्ये आयपीएल मॅचेसचे स्क्रीन लावले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना मॅचचा आनंद घेता येईल.
उद्योगपती संजय घोडावत, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, चकोते उद्योग समूहाचे आण्णासाहेब चकोते, रमाकांत वाळवेकर, सूर्यकांत मगदूम, दीपक सुर्वे, अभिषेक वाळवेकर, प्रमोद बचाटे, ओमकार सुर्वे, प्रशांत कांबळे, अनिकेत मगदूम, सुशांत कलागते, आणि प्रशांत सपाटे यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभात उपस्थित होते.
