कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गांधीनगर सह 13 गावांमधील पाणीपुरवठा संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली.


या बैठकीत मोरेवाडी येथील पाणी टाकीची साठवण क्षमता वाढवणे, पाचगाव,आर के नगर,मोरेवाडी येथे पाईपलाईन बदलण्याच्या कामाला गती देणे, कागल ते वैभव टेकडी दरम्यानच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणे यासह विविध निर्णय घेण्यात आले. तसेच दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेऊन पाहणी करण्याचे निर्देश आ. महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
