मंत्री आबिटकर यांची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत गुणवत्ता प्राप्त शाळांना बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती

कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी व भुदरगड तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत 2024-25 सालातील केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता प्राप्त शाळांना बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे, बाबा नांदेकर, भुदरगड गटविकास अधिकारी शेखर जाधव, राधानगरी गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, सर्जेराव देसाई, विश्वजीत जाधव, मिलिंद पांगिरकर, बी.एस.पाटील, सुरेश संकपाळ, वसंतराव प्रभावळे, बाळकृष्ण हळदकर यांच्यासह प्रमुख मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.