आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते तारदाळ येथील सार्वजनिक हॉलचे लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : जीके नगर तारदाळ येथील ग्रामस्थांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रसंग साक्षीदार झाला, माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सार्वजनिक हॉलचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले. या सार्वजनिक हॉलचे लोकार्पण सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि भव्यपणे संपन्न झाला.

 

लोकार्पण सोहळ्याला माजी सरपंच यशवंत वाणी, सुनील कांबळे, रणजीत माने,‌ सूर्यकांत जाधव, योगेश वाणी ,विनायक माळी ,महादेव मगदूम, प्रभाकर जाधव, राजेश शिंदे, अण्णासो,कोडणीकर, शशिकांत घाडगे, रामचंद्र पांडव, हरीश गायकवाड ,सुरेश रणदिवे, सुनिता साखळकर ,सचिन चौगुले ,राणी शिंदे, संगीता पाटील, धैर्यशील शिंदे, तुकाराम सपताळ, रोहित मोरबाळे, रणजीत मोरे, संतोष कागले ,दत्तात्रय कनुकले ,मारुती जाधव ,शाहू जगदाळे ,मयूर तिवडे, स्वप्निल काळे ग्रामस्थ, स्थानिक नागरिक, शालेय शिक्षक, समाजसेवक, तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उद्घाटन भाषणात या सार्वजनिक हॉलचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, या हॉलच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक उत्तम सुविधा उपलब्ध होईल. यामुळे स्थानिक समाजाच्या एकात्मतेला चालना मिळेल, आणि विविध उपक्रमांना आवश्यक व्यासपीठ देखील मिळेल.