कळंबा येथे खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाला अरुंधती महाडिक यांची उपस्थिती

कोल्हापूर : कळंबा येथे विठ्ठलाई तरुण मंडळाच्या वतीने खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी सौ. महाडिक यांनी उपस्थित भगिनींशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

 

 

एकमेकींशी मनमोकळ्या गप्पा मारत, खेळाचा आनंद घेत खूप मोठ्या प्रमाणात महिलांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला. महिलांना त्यांचे कलागुण दाखवण्याचा व त्यांच्यामध्ये चैतन्य व उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न विठ्ठलाई तरुण मंडळाने केला आहे. याबद्दल सौ महाडिक यांनी या मंडळाचे अभिनंदन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी शानदार प्रदर्शन घडवले तसेच विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसांचे वितरण केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी मोटे यांनी केले तसेच यावेळी ग्रा. पं. सदस्य छाया भवड, अलका पाटोळे, सुनील पडळकर, मामानसी पोवार, इंदुमती भवड, विजया खोत, उमेश भवड यांसह अनेक मान्यवर आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.