स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून सरकारचा निषेध

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी केलेली वल्गना तसेच शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयावर गुढी पाडव्यादिवशी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला.

 

 

दिवसभरात कोल्हापूर , सांगली , परभणी , वाशिम , जालना , छत्रपती संभाजीनगर , सातारा , सोलापूर , बारामती याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.