ग्रामीण भागातील मुलांना व मुलींना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना साक्षर करा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : चिकोत्रा खोरे शिक्षण प्रसारक मंडळ हसूर बुद्रुक संचलित, बोटे पब्लिक स्कूल, सेनापती कापशी या नवीन शाळेचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत होते.

 

 

 

या शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांचे देखील मार्गदर्शन करून मोठ मोठे अधिकारी घडवावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आहे. त्याच पद्धतीने आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील मुलांना व मुलींना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना साक्षर करा

या कार्यक्रमाला सेनापती कापशी गावच्या सरपंच उज्वला कांबळे, उपसरपंच सौरभ नाईक, प्रवीण नाईकवाडे, सुनील चौगुले, पत्रकार चंद्रकांत पाटील, तसेच या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोटे, प्राचार्य प्रमिला बोटे, मुख्याध्यापिका वैशाली बोटे, कार्यकारी सल्लागार विठ्ठल बोटे, ईश्वरा बोटे, शांताबाई बोटे, श्रीमती सुरेखा चौगुले, यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी व या शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545