आ. सतेज पाटील यांनी दिली खेबवडे येथील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला भेट

कोल्हापूर : खेबवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेला आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. पै. सुशांत पाटील (म्हाकवे) विरुद्ध पै. सारंग पाटील (पाडळी खुर्द) या कुस्तीचा प्रारंभ आमदार सतेज पाटील हस्ते आणि माजी आमदार के. पी. पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पै. सुभाष वाडकर यांच्या उपस्थितीत झाला.

गोकुळचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, कोल्हापूर बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, संचालक कुमार आहुजा, सुयोग वाडकर, माजी संचालक सचिन घोरपडे, कोल्हापूर कुस्तीगीर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पै. रवींद्र पाटील (बानगेकर), उपमहाराष्ट्र केसरी पै संग्राम पाटील, बिद्रीचे संचालक एस. बी. पाटील, आर.एस.कांबळे, ‘गोडसाखर’चे संचालक विद्याधर गुरबे, युवराज गवळी, सरपंच किरण चौगुले, माजी उपसरपंच उत्तम वाडकर, भोला चौगुले, एम.बी वडणगेकर, सी. बी.चौगले, नारायण गाडगीळ, विश्वास दिडोर्ले यांच्यासह संयोजक, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, कुस्तीशौकीन आणि पंचक्रोशीतील असंख्य लोक उपस्थित होते.

🤙 9921334545