कोल्हापूर : इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इचलकरंजी शहर कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ , चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, विठ्ठल चोपडे, लतीफ गैबान, सुहास कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.