मुंबई : 2025 च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी पन्हाळा येथील शिवस्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी द्यावा ही मागणी केली होती.
या मागणीला तातडीने प्रतिसाद देत शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवस्मारकासाठी तात्काळ 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले, तसेच या स्मारकाची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचे निर्देश दिले, तसा शासकीय आदेश (जी. आर.) आमदार नरके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
या तातडीच्या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यतत्परतेचे दर्शन पुन्हा एकदा कोल्हापूरवासियांना झाले.
यावेळी नरके यांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा गडावर सुंदर असं शिवस्मारक उभारण्याचे काम या निधीमुळे मार्गी लागले याचे खूप समाधान वाटत आहे. करवीर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांच्यावतीने आमचे नेते मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार. अशा भावना व्यक्त केल्या.