संसदेत होणार ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदार राहणार उपस्थित

मुंबई : २७ मार्च रोजी संसदेत ‘छावा’चं स्क्रीनिंग केलं जाणार आहे.संसदेत असलेल्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये बालयोगी ऑडिटोरियममध्ये ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, संसदेतील इतर खासदारही या शोला हजर राहणार आहेत.

 

 

त्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजन आणि चित्रपटातले कलाकारही स्क्रीनिंगवेळी संसदेत उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदींनी याआधीच ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर मोदींच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी अर्थात ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केलेल्या भाषणात ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक केले होते. तेव्हा त्यांनी ‘छावा’ चित्रपट धुमाकूळ घालत असल्याचे म्हटले होते.

🤙 9921334545