आ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी गाव भागातील विविध विकासकामांची केली पाहणी

कोल्हापूर : इचलकरंजी गाव भागातील महादेव मंदिर परिसर, मगदूम दर्गा परिसर, राणा प्रताप चौक परिसर, पाटील गल्ली रोड, मुजावर गल्ली परिसर या ठिकाणी माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.

 

 

यावेळी त्यांनी कामांच्या दर्जाची तपासणी केली तसेच अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात बाळासाहेब कलाकाते, अहमद मुजावर, राहुल घाट, किशोर पाटील, अभिजीत पाटील किणीकर, शिवाजी काळे, राजू दरीवे, बजरंग कुंभार, अरिफ अत्तार, मौला मुजावर, बाबू रुग्गे, दादासो मगदूम, दिलीप कुरणे, उमर लाटकर, राजू कोरे, तानाजी कोकिटकर, अमीर मुजावर, अल्ताफ मुजावर, हरीश मुजावर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि विकासकामांसाठी त्यांची कायम कटिबद्धता राहील असे सांगितले. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

🤙 9921334545