सुळकुड येथे मंत्री मुश्रीफ यांचा भव्य सत्कार

कोल्हापूर : सुळकुड ता. कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.

 

 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय शिक्षणमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये जनतेसाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा कोल्हापूर जिल्ह्यात उपलब्ध करून देईन. त्यासाठी मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. माझ्या राजकीय विरोधकांनी पाच वर्षात परिवर्तन, शाश्वत विकास करण्याचा प्रचार केला. तसेच; ईडीद्वारा मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला. परंतु; जनताच माझ्या कामामुळे पाठीशी राहिल्यामुळे त्यांच्या कुटील कारस्थानांना यश आले नाही.
मतदारसंघातील जनतेने मला गेली २७ वर्षे निवडून देऊन सेवा करण्याची संधी दिली, ही काही सामान्य गोष्ट नाही. त्याची जाणीव ठेवून मतदारसंघ, जिल्ह्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या सर्व सुविधा व अपेक्षापूर्तीसाठी त्यांना भिडून जीवाची बाजी मी लावत आहे. माझी नियत व दानत चांगली आहे. त्यामुळे सामान्य माणूस, गोरगरीब, माताभगिनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे माझा निवडणुकीत पराभव होऊ शकत नाही.
जिल्हा बँक संचालक भैया माने यांनी भाषणात अपात्र कर्जमाफीवरील सेवा संस्थांना परत दिलेल्या 63 कोटी रुपयांच्या निर्णयाबद्दल व कोल्हापूर येथे होणाऱ्या आयटी हबच्या प्रयत्नांचे श्रेय श्री. मुश्रीफ यांना दिले.
प्रमुख पाहुणे माजी आमदार संजय घाटगे यांनी सुळकूड पाणी योजना रद्द होईपर्यंत मुश्रीफ थांबले नाहीत. याबद्दल अभिनंदन करून सुळकूड पुलानजीक भरावाऐवजी पाईप्स टाकून सोय करण्यासाठी यांना लक्ष घालण्यास सांगितले.

🤙 9921334545